यावलमधील नागरी समस्यांबाबत पालिका प्रशासनाला निवेदन
यावल : शहरातील खाटीकवाडा, मटण मार्केट भागातील टाकीला आऊटलेट सुविधा करावी तसेच टाकीवर जाळी लावावी, अशी मागणी रावेर-यावल विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मोहम्मद फैजान अब्दुल गफ्फार शाह यांनी पालिकेच्या मुख्याधिकार्यांकडे केली आहे. निवेदनानुसार या टाकीत व्यावसायीक बकरीचे खाद (चाटर) टाकत असल्याने टाकीत अळ्या पडल्या आहेत त्यामुळे साथीचे आजार पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालिका प्रशासनाने निवेदनाची दखल घेवून उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
यांच्या निवेदनावर स्वाक्षर्या
या निवेदनावर नईम युनूस खाटीक, इकबरा हारूण खाटीक, साबीर ताहेर, युनूस इब्राहीम खाटीक, तौफिक ताहेर खाटीक, अरफात असलम खाटीक, अकरम जमील खाटीक, रहिम असगर खाटीक, असगर गुलाब खाटीक आदी पदाधिकार्यांच्या स्वाक्षर्या आहेत.
