आगामी सण-उत्सव शांततेत साजरे करावेत : निरीक्षक कैलास नागरे
रावेर : सर्वांनी येणारे सण-उत्सव एकोप्याने साजरे करावे, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी शिवाय कोरोना काळातून दोन वर्षानी नंतर आपण बाहेर येत असून उत्सवाला कुठेही गालबोट लागणार नाही याची प्रत्येकाने कटाक्षाने काळजी घ्यावी व माथी भडकवर्यांची नावे पोलिस प्रशासनाला द्यावीत, असे आवाहन पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांनी येथे केले. रावेर पोलिस स्टेशनच्या आवारात शांतता कमेटी बैठकीत ते बोलत होते.
यांची होती उपस्थिती
या बैठकीला माजी आमदार अरुण पाटील, नगरपालिका प्रतिनिधी काळे, माजी आमदार अरुण पाटील, पोलिस उपनिरीक्षक मनोहर जाधव, उपाध्यक्ष पद्माकर महाजन, जयंती उत्सव समिती अध्यक्ष पंकज वाघ, राष्ट्रवादी शहराध्यक्ष मेहमूद, काँग्रेस शहर उपाध्यक्ष संतोष पाटील, गयास शेख, युसूफ खान, असद खान, सादीक शेख, रफीक भाई, आरीफ भाई, गयास काझी, धुमा तायडे, भाजपा तालुका चिटणीस उमेश महाजन, महेश तायडे, हिलाल सोनवणे, मौलाना गयासुद्दीन, मंजूर भाई, इम्रान शेख, बाळू शिरतुरे, अॅड.योगेश गजरे, कैलास तायडे, आर.आर.महाजन, भाऊलाल पहेलवान, दिलीप कांबळे, अशोक शिंदे, शैलेंद्र अग्रवाल, भोकरीकर आदी बैठकीला उपस्थित होते.
