भुसावळ शहरात भगवान मिनिष यांच्या मूर्तीची स्थापना
भुसावळ : शहरातील तापी नदीच्या काठावर गुरुवारी भगवान मिनिष भगवान यांच्या मूर्तिची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी भगवान मिनेष यांचा जयघोष करण्यात आला. भगवान मिनेष हे श्री विष्णू भगवानांचा प्रथम अवतार असल्याचे मानले जाते त्यामुळे या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कलश मिरवणूक काढून काढण्यात आली. यावेळी महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, उत्तरप्रदेश सहित राजस्थान व अन्य राज्यातील मीना समाजाचे पंच पटेल व महिला शक्ती व लहान मुले हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
यांची होती उपस्थिती
या सर्वांच्या पंचकर्माद्वारे व रेल्वेचे अपर मंडळ रेल प्रबंधक रुकमैय्या मीना यांच्या संयुक्त विद्यमाने व सहकार्याने भुसावळातील तापी नदीवरील पवित्र स्थळी रेल्वे पंप हाऊस जवळ श्री मिनेष भगवान यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व स्थापना करण्यात आली. या भव्य-दिव्य समारंभात राष्ट्रीय मीना उत्थान मंचचे सर्व सदस्य व महानुभाव उपस्थित होते. श्री मिनेष भगवान यांची मूर्ती ही राजस्थान येथून सरस्वती नदी अलबट झीरींगावच्या संगमरवर या दगडाने बनवण्यात आली आहे. या मूर्तीची उंची सव्वा तीन फूट असून ती मत्स्यावर आरूढ आहे. यावेळी भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले.
