दीपनगरच्या केमिकल युक्त राखेमुळे भोगावती नदी प्रदूषित

केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांकडे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांची तक्रार


वरणगाव : भोगावती नदीचा उजनीपासून उगम होतो तर वरणगाव शहरातून दीपनगर वीज निर्मिती केंद्रापासून तापी नदीला मिसळते. त्यात दीपनगर वीज निर्मिती केंद्रातील निघणार्‍या राखेचे केमिकल युक्त विषारी पाणी हे भोगावती नदीत जात असल्याने नदी संपूर्णपणे प्रदूषित झाली आहे. या गंभीर बाबीबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांकडे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी तक्रार नोंदवली आहे.

जलचर प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात
भोगावती नदीत हे केमिकलयुक्त पाणी मिसळले जात असून एक सुद्धा जलचर प्राणी जिवंत नाही. त्यातच विषारी केमिकल युक्त राखेचे विषारी पाणी तापी नदीमध्ये जात असल्याने असंख्य जलचर प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. विषारी पाणी तापीत जात असल्याने अनेक नागरीकांना जीवघेणे आजार होत आहेत. दीपनगर वीजनिर्मिती केंद्रावर भोगावती नदी प्रदूषित केल्याने कडक कारवाई करावी अन्यथा भोगावती नदी बचांवासाठी जनआंदोलन उभारणार असल्याचा इशारा माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिला आहे. भोगावती नदी प्रदूषित केल्याची तक्रार केंद्रीय प्रदूषण व पर्यावरण मंत्री व विरोधी पक्ष नेते यांच्या कडे माजी नगराध्यक्ष सुनील काळे, मिलिंद भैसे, ऋषिकेश महाजन, आकाश निमकर यांनी केली आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !