भुसावळात माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांना ग्रंथ भेट


भुसावळ : शहरातील डॉ.जगदीश पाटील लिखीत ‘श्री संत एकनाथांच्या अभंगातील भक्ती’ हा ग्रंथ माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांना नुकताच भेट देण्यात आला. माजी स्वीकृत नगरसेवक डॉ.सुनील नेवे यांच्या अटल निवासस्थानी माजी मंत्री खडसे आले असता ग्रंथ भेट देण्यात आला.

सोमय्या पिता-पुत्राच्या अडचणीत कायम : मुंबई सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला

यांची होती उपस्थिती
यावेळी हभप लक्ष्मण महाराज, डॉ.सुनील नेवे, डॉ.जगदीश पाटील उपस्थित होते. खडसे यावेळी म्हणाले की, भक्ती हा ग्रंथ संत एकनाथांच्या चरीरत्राबरोबरच त्यांच्या अभंगातील नवविधा भक्ती कथन करत असल्याने या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांच्या अभंगाचे विश्लेषण झाले आहे. त्यामुळे हा ग्रंथ वाचकांना व संशोधकांना संदर्भ म्हणून लाभदायी ठरणार आहे. संतांनी केलेले कार्य हे अजरामर आहे. देवाची भक्ती करण्याबरोबरच संतांनी समाजाच्या उद्धाराचेदेखील काम केले आहे. त्यामुळे संतांचे कार्य हे दिशादर्शक आहे. संतांनी मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मिती केलेली आहे. त्यांच्या साहित्याचा अभ्यास करून नवसंशोधक व लेखकांनी समाजाला दिशा देण्याचे काम करावे, असे आवाहनही एकनाथराव खडसे यांनी केले.


वीजपुरवठा सुरळीत करा अन्यथा जळगाव जिल्ह्यात एकाही मंत्र्याला फिरु देणार नाही ; माजी मंत्री गिरीश महाजन


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !