भुसावळात 19 पासून कबड्डी स्पर्धेचा रंगणार थरार


भुसावळ : कबड्डी खेळाची लोकप्रियता वाढवण्याच्या दृष्टीकोनातून जळगाव जिल्हा कबड्डी असोशिएशनच्या मान्यतेखाली महाबली क्रीडा प्रसारक मंडळाच्या सहकार्याने श्री रामराज्य फाऊंडेशन, भुसावळतर्फे मंगळवार, 19 एप्रिल व बुधवार, 20 एप्रिल 2022 रोजी पालिका शाळा क्रमांक 29, जळगांव रोडच्या पटांगणावर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा होत आहे. दिवस-रात्र खेळवण्यात येणार्‍या 70 किलो वजनी गटातील या स्पर्धेत 24 संघाचा समावेश आहे. आधी साखळी सामने नंतर बाद फेरीचे सामने होतील. मॅटवर होणार्‍या या स्पर्धेचे पहिले बक्षीस 11 हजार, चषक, द्वितीय बक्षीस सात हजार व चषक, व तृतीय बक्षीस पाच हजार व चषक असे आहे. स्पर्धेसाठी महाबली क्रीडा मंडळ, श्रीरामराज्य फाऊंडेशन, श्रीनगर मित्र परीवार, भोई नगर मित्र परिवार, अष्टविनायक कॉलनी मित्र परीवार, हुडको कॉलनी मित्र परीवार, भोई नगर मित्र मंडळ व परीसरातील तरुण कार्यकर्ते परीश्रम घेत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !