भुसावळात मेजर रॉबर्ट गील यांना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन


भुसावळ : अजिंठा लेणी भित्तीचित्राची सर्वप्रथम प्रतिकृती साकारणारे महान चित्रकार मेजर रॉबर्ट गिल यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘अजिंठा’ या विषयावर चित्र आदरांजली अर्पण करण्यात आली. रविवारी शहरातील ख्रिश्चन दफनभूमीत असलेल्या त्यांच्या कबरीजवळ हा वेगळा उपक्रम राबवून त्यांना जिल्हाभरातील नामवंत चित्रकारांनी आदरांजली वाहिली. रेव्हरंड किशोर गायकवाड यांनी प्रार्थना करीत श्रद्धांजली अर्पण केली.

यांची होती उपस्थिती
ज्येष्ठ चित्रकार तथा ललित कला महाविद्यालय चोपड्याचे प्राचार्य राजेंद्र महाजन, सप्त पुट ललित कला महाविद्यालय खिरोद्याचे प्राचार्य अतुल मालखेडे, राजू बाविस्कर, शाम कुमावत, हरुन पटेल, निरंजन शेलार, शामकांत वर्डीकर, रमाकांत भालेराव, सुभाष पवार, अर्चना शेलार, वंदना पवार, श्रीकांत पवार, पार्थ चौधरी यांनी अजिंठा या विषयावरील चित्र साकारले. सन्मान समारंभात सुरुवातीला आर्टिस्ट व्हिजन फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र जावळे यांनी संस्थेचे कार्य व भावी योजनांवर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.राजेंद्र महाजन तर प्रमुख पाहुणे म्हणून अतुल मालखेडे, राजू बाविस्कर हे होते. सूत्रसंचालन राजेश्री देशमुख यांनी केले. सेंट पॉल चर्चचे सदस्य काशिनाथ कनोजे, मोहित पाटील, संतोष उपाध्याय, किशोर पाटील, जयश्री चौधरी यांनी परीश्रम घेतले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !