चिंचोली शिवारात गायीला अमानुष मारहाण : युवकाविरुद्ध गुन्हा


यावल : तालुक्यातील चिंचोली शिवारातील शेतात एक जण गायीला अमानुषपणे मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्याची सत्यता पडताळणीसाठी प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलिस अधीक्षक आशीत कांबळे यांनी उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान, भूषण चव्हाण यांना पाठवले. त्यात ही गाय कोणाच्याही शेतात घुसून पिकांचे नुकसान करते म्हणून भरत धारा भरवाड (20, रा.पळासनेर, ता.शिरपूर ह.मु.चिंचोली शिवार) याने गायीला मारहाण केल्याची कबुली दिली. पोलिस कर्मचारी सुशील घुगे यांच्या फिर्यादीवरून मुक्या प्राण्यास मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार नरेंद्र बागुले करत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !