लग्नाच्या आमिषाने युवतीवर पाच वर्ष बलात्कार


Nashik Balatkar नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर पाच वर्ष बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी फसवणूक झालेल्या पीडीतेने नाशिकरोड पोलीस ठाण्यात युवकाविरोधात तक्रार दिली असून अन्य तिघांनी जातीवाचक शिविगाळ केल्याने त्यांच्याविरोधात अ‍ॅट्रसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी निलेश नामदेव माळोदे (27, रा.माडसांगवी, ता.जि.नाशिक) यास अटक करण्यात आली.

लग्नाचे वचन देत बळजबरी ठेवले शारीरीक संबंध
लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने तब्बल पाच वर्ष बलात्कार केला तर संशयितासह त्याच्या कुटूंबियांनी जातीवाचक शिवीगाळ करून लग्नास नकार दिल्याने हा प्रकार पोलीसात पोहोचला. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार संशयीताने तिला लग्नाचे आमिष दाखविल्याने 1 जानेवारी 2017 ते 1 जानेवारी 2022 दरम्यान दोघांमध्ये प्रेमसंबध होते. यातून जेलरोड परीसरातील शिवाजीनगर येथील एका फ्लॅटमध्ये तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. चार – पाच वर्ष उलटल्याने युवतीने लग्नाचा तगादा लावला असता ही घटना घडली.


कुटूबियांनी केली शिविगाळ
संशयीताने लग्नास टाळाटाळ करीत नकार दिल्याने तिने त्याचे घर गाठले असता संशयीताची आई सुनिता माळोदे, उमेश माळोदे व शरद हांबरे आदींनी तिला जातीवाचक शिवीगाळ करीत दमदाटी केल्याने मुलीने पोलिसात धाव घेतली. तपास सहाय्यक आयुक्त धुमाळ करीत आहेत.

नशिराबादच्या प्रौढाचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !