वाढदिवसाच्या पार्टीनंतर गाठले मृत्यूने : शिरपूरातील जीवलग मित्रांचा मृत्यू
मुंबई-आग्रा महामार्गावर अपघात : अपघातानंतर अज्ञात वाहन चालक पसार
Close friend Death of in Shirpur शिरपूर : वाढदिवसाच्या दुसर्या दिवशीच मित्रांना पार्टी देण्यासाठी आलेल्या तरुणासह त्याच्या मित्राचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू (Accidant Death) झाला. हा अपघात मंगळवारी रात्री साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावर शिरपूरपासून काही अंतरावर असलेल्या पेट्रोल पंपासमोर घडला. या अपघातात युवा छायाचित्रकार नील धर्मेंद्र पटेल (22, रा.मारवाडी गल्ली, जामा मशिदीसमोर, शिरपूर) व पार्थ सुनील सोनार (19, रा.मारवाडी गल्ली, जामा मशिदीसमोर, शिरपूर) या दोघांचा जागीच मृत्यू झाला.
डोंगरकठोर्यातील शेतकर्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
वाढदिवसाच्या दुसर्या दिवशी गाठले मृत्यूने
शिरपुरातील युवा छायाचित्रकार नील धर्मेंद्र पटेल याचा सोमवार, 11 एप्रिलला वाढदिवस असल्याने मित्रांना त्याने मंगळवारी पार्टी दिली होती. त्यासाठी मित्र मंडळी दुचाकीने मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल गॅलेक्सीत आले होते. जेवण झाल्यानंतर मित्र शहराकडे निघाले असता नील, पार्थ व जयेश पवार हे तिघे एकाच दुचाकीने निघाले असताना महामार्गावरील रीलायन्स पेट्रोल पंपाजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने नील पटेल व पार्थ सोनार यांचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवर बसलेला तिसरा मित्र जयेश पवार गंभीर जखमी झाला.

शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
अपघाताची माहिती मिळताच नातेवाईक व मित्र मंडळीनी रुग्णालयात धाव घेतली. शिरपूरचे आमदार काशीराम पावरा व प्रभाकर चव्हाण यांनी रुग्णालयात भेट देत नातेवाईकांचे सांत्वन करीत माहिती जाणून घेतली. दरम्यान, मयत नील हा आरसी पटेल महाविद्यालयात बीबीएच्या तिसर्या वर्षाला शिक्षण घेत असलेला कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता शिवाय त्याचे कॅनडात जाण्याचे स्वप्नही होते. त्याचे वडील धर्मेंद्र पटेल हे सावळदे येथील निम्स कॉलेजला आहेत तर मयत पार्थ हा हॉटेल व्यावसायीक सुनील सोनार यांचा धाकटा मुलगा होय.