ओव्हरटेक करताना तिहेरी अपघात : रीक्षा चालकासह तिघे जखमी


जळगाव : शिरसोली रस्त्यावरील जैन व्हॅलीजवळ ओव्हरटेक करताना तिहेरी अपघातात रीक्षा चालकासह दुचाकीवरील दोन जण गंभीर जखमी झाले. तिघांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

विचीत्र अपघातात तिघे जखमी
जळगाव तालुक्यातील शिरसोली रोडवरील जैन व्हॅलीसमोरून रिक्षा (एमएच 19 व्ही 5583) ने रिक्षा चालक अय्याज शेख शहानुद्दिन शेख (35, रा. शनीपेठ, जळगाव) हे शुक्रवार, 15 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास रीक्षाने शिरसोलीकडून जळगावकडे जात होते. त्यावेळी त्याच्या रीक्षाच्या मागे दुचाकीने विजय मधूकर चौधरी आणि चेतन रघुनाथ भावसार दोन्ही रा. रामेश्वर कॉलनी हे भरधाव वेगाने येत होते. दरम्यान, रीक्षाच्या मागून येणार्‍या दुचाकीस्वाराने ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून आलेल्या कार (एमएच 12 टीएच 2295) ला जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर दुचाकीवरील दोघे हे रिक्षावर आदळले. त्यामुळे रिक्षा देखील पलटी झाली. या विचित्र अपघातात रिक्षाचालकासह दुचाकीवरी दोघेजण गंभीर जखमी झाले. तिघांना खासगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !