भुसावळातील शिवभोजन केंद्रातर्फे गरजूंना मोफत अन्नदान
भुसावळ : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीसह जैन समाजाचे आराध्य दैवत भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्ताने मान्यवरांच्या हस्ते गुरुवारी शिवभोजन केंद्रावर गरजूंना मोफत अन्नदान करण्यात आले. कट्टर शिवसैनिक नमा (उमाकांत) शर्मा यांनी हा उपक्रम राबवला.
यांची होती उपस्थिती
या प्रसंगी निवासी नायब तहसीलदार शशीकांत इंगळे, शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन, आरपीआय जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, जयंती उत्सव समिती अध्यक्ष शरद सोनवणे, वंचित आघाडीचे दिनेश ईखारे, रवी सपकाळे, शिवसेना शहरप्रमुख निलेश महाजन, शिवसेना माजी नगरसेवक मुकेश गुंजाळ, अॅड.कैलास लोखंडे, संजय ब्राह्मणे, वरणगाव शहरप्रमुख संतोष माळी, काँग्रेसचे प्रकाश निकम, जे.बी.कोटेचा, शिवसेना उपशहर प्रमुख राकेश खरारे, शिवसैनिक जवाहर गौर, अरुण साळुंखे, अमजद खान, दर्शन मुंडे, सतनाम सिंह, शिवभोजन केंद्र संचालक उमाकांत शर्मा (नमा) आदी उपस्थित होते. यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुण व बुंदी लाडूचेही वाटप करण्यात आले.
