कंटेनर रीव्हर्स घेताना विद्युत डीपीवर आदळल्याने चालक जागीच ठार


Jalgaon Accidant जळगाव : कंटेनर रस्त्याच्या कडेला पार्किंग करीत असताना अचानक वीज तारांना स्पर्श झाला. त्यानंतर चालकाने खाली उतरून पाहणी केली. पुन्हा केबिनमध्ये चढत असताना चालकास विजेचा धक्का बसल्याने त्याचा जागेवरच कोसळून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी 9 वाजता खेडी परिसरातील एका पेट्रोल पंपाच्या बाहेर घडली. ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात चित्रित झाली. जगदीश सिंह बोरा (39, रा. राम मंदिर, चखबोरा, पिथौरगड, उत्तराखंड) असे मृत चालकाचे नाव आहे.

कंटेनर रीव्हर्स घेताना अपघात
जगदीश हा कंटेनर घेऊन मुंबईकडे निघाला होता. खेडी परिसरातील एका पेट्रोल पंपाच्या बाहेर तो थांबला होता. रस्त्यात अडचण नको म्हणून सकाळी तो कंटेनर रस्त्याच्या कडेला उभी करत होता. यावेळी शेजारी विजेचे खांब, डीपी व तार होते. कंटेनर पार्किंगसाठी पुढे-मागे करीत असताना एक बाजूचा वीज तारांना स्पर्श झाला. अंदाज घेण्यासाठी जगदीश कंटेनरमधून खाली उतरून वीज खांबाजवळ गेला. कंटेनर आणखी पुढे नेले तर खांब, तार पडू शकतो असा निष्कर्ष काढून तो पुन्हा कॅबीनकडे आला. आता त्याला कंटेनर मागे घ्यायचे होते. तत्पूर्वी कंटेनरच्या बॉडीत वीजप्रवाह उतरला होता.यापासून अनभिज्ञ असलेला जगदीशने केबिनमध्ये बसण्यासाठी लोखंडी रॉड पकडताच त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. त्यामुळे अवघ्या काही सेकंदात त्याचा मृत्यू झाला.






एमआयडीसी पोलिसांची घटनास्थळी धाव
ही घटना एमआयडीसी पोलिसांना कळल्यानंतर त्यांनी जगदीशचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला. त्यानंतर परिसरातील वीज प्रवाह खंडित करून कंटेनर बाजूला केला. दरम्यान, खिशातील आधारकार्डवरून जगदीशची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

विषय न कळणार्‍यांच्या वक्तव्याला महत्व नाहीच ! फडणवीसांच्या ट्विटबाबत जळगावात शरद पवार स्पष्टच म्हणाले

भुसावळात अष्टभूजा मातेच्या जयघोषात ओढल्या बारागाड्या 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !