जळगावात शासकीय होमिओपॅथी कॉलेज मंजूर
जामनेर : राज्यातील पहिल्याशासकीय होमिओपॅथी कॉलेजला जळगावात केंद्र शासनाने मंजुरी दिली असून पहिल्या टप्प्यात बीएचएमएसच्या पदवीसाठी 50 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. जळगाव येथील मेडिकल कॉलेजमध्ये होमिओपॅथी कॉलेजला मान्यता मिळावी, यासाठी माजी मंत्री गिरीश महाजन यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले.
कंटेनर रीव्हर्स घेताना विद्युत डीपीवर आदळल्याने चालक जागीच ठार
आमदार महाजनांच्या प्रयत्नांना यश
आमदार गिरीश महाजन हे राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री असताना जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यात आले होते. चिंचोली शिवारात वैद्यकीय शाखांशी संबंधित सर्व कॉलेजेस एकाच ठिकाणी उभारण्यासाठी मेडिकल हबला देखील परवानगी मिळाली होती. दरम्यान, मेडिकल हबमधीलच होमिओपॅथी कॉलेज सुरू व्हावे यासाठीही सातत्याने पाठपुरावा सुरू होता. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्याकडे मागणी केली होती. या पाठपुराव्याला यश आले आहे. होमिओपॅथी कॉलेज संदर्भातील परिपत्रक केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयाने शुक्रवारी जारी केले आहे.





