‘मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा’ कवितेला रसिकांनी दिली दाद


दीपनगर :

दुःख अडवायला उंबर्‍यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा…
वाट चुकणार नाही जीवनभर कोणी,
एक तू मित्र कर आरश्यासारखा,
यासह अन्य कवितांना उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक जयंती उत्सव निमित्ततर्फे आयोजित कवी संमेलनात कवी अनंत राऊत यांनी आपल्या अनेक कविता सादर केल्या. अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता विजय राठोड होते.


यांची होती उपस्थिती
यावेळी 660 नवीन प्रकल्पाचे उपमुख्य अभियंता महेश महाजन, कामगार कल्याण अधिकारी पंकज सनेर,माजी उपसरपंच राजेश साबळे, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश तायडे, कंत्राटदार कैलास लांजुळकर,दत्तात्रय साबळे उपस्थित होते. वसाहतीत कामगार भरत पाटील, बी.जे.चौधरी, महेंद्र चव्हाण, अनिता महाजन यांनी विविध गीते सादर केली. समितीचे सचिव रोशन वाघ यांनी प्रमुख पाहुणे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. मोहन सरदार यांनी सूत्रसंचालन केले. यशस्वीतेसाठी जयंती उत्सव समितीचे सचिव रोशन वाघ, सहसचिव सुभाष मेश्राम, रोहन काकडे, छगन पवार, मोहित कांबळे, गणेश राठोड, मनोहर बार्‍हे मिलिंद खंडारे यांनी परीश्रम घेतले. कवी संमेलन आधी झालेल्या कराओके सुपर स्टार स्पर्धेचे परीक्षक म्हणून ममता रामटेके, अनिता महाजन, सुनिता पाटील, चित्रा पाटील यांनी काम पाहिले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !