अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला
जळगाव : नशिराबाद-जळगाव रोडवर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला असून या प्रकरणी नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
ओळख पटवण्याचे आवाहन
नशिराबाद-जळगाव रोडवर शिवशक्ती कारबाजार समोर रस्त्यालगत अनोळखी पुरूषाचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती नशिराबाद पोलिसांना कळताच पोलिसांनी धाव घेवून अनोळखीस जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्यांनी त्यास मृत घोषित केले. मयताचे अंदाजे 35 ते 38 वर्ष असे असून त्यांची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
