वरणगाव पाणीपुरवठा योजनेवरील भारनियमन रद्द करा

भाजपा पदाधिकार्‍यांचे वीज वितरण कंपनीला साकडे


वरणगाव : वरणगाव पाणीपुरवठा योजनेवरील भारनियमन रद्द करावे, अशी मागणी भाजपा पदाधिकार्‍यांनी वीज कंपनीकडे निवेदनाद्वारे केली आहे. शहराला 12 दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने शहरातील नागरीकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर हाल आहेत. वरणगाव पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेल कठोरा 132 केव्ही सबस्टेशनवर अघोषित भारनियमन होत असल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. नागरीकांचे हाल थांबविण्यासाठी भाजपाच्या वतीने अधीक्षक अभियंता फारुख शेख यांना निवेदन देण्यात आले.

यांची होती उपस्थिती
निवेदन देताना माजी नगराध्यक्ष सुनील काळे, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे, अ‍ॅड.ए.जी.जंजाळे, महिला तालुकाध्यक्ष मनीषा पाटील, जिल्हा सरचिटणीस डॉ.सादिक, किसान मोर्चाचे अध्यक्ष ऋषिकेश महाजन, आकाश निमकर, साबीर कुरेशी, बळीराम सोनवणे, राहुल जंजाले उपस्थित होते. दरम्यान, निवेदनाची दखल न घेतल्यास भाजपाच्या वतीने भारनियमन रद्द करण्याच्या मागणीसाठी मागणीसाठी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी चर्चेदरम्यान अधीक्षक अभियंता फारुख शेख व उपकार्यकारी अभियंता तुषार गांजरे यांना यावेळी दिला. दरम्यान, वरणगाव शहरात अवेळी वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने या प्रकारांना पायबंद घालावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. वरणगाव शहरातील शिवतीर्थ व रहदारीच्या वस्तीतील ज्या डीपी अडथळा ठरत आहेत त्या हटवण्याची मागणीही करण्यात आली.


दुचाकी अडवून मारहाण करीत दोन लाखांची रोकड लांबवली 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !