विरावलीत दोन गट भिडल्यानंतर तुंबळ हाणामारी : चौघे जखमी, दहा जणांविरोधात गुन्हा
Virawali Dangal यावल : शेतातील किरकोळ कारणांवरून वाद उफाळल्यानंतर दोन गटात दंगल झाली. यात दोन्ही गटातील 10 जणांविरूध्द दंगली सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मारहाणीत चार जण जखमी झाले. तालुक्यातील विरावली येथे रविवारी ही घटना घडली.
आधी पत्नीने प्यायले विष नंतर पतीचीही विहिरीत उडी मारून आत्महत्या
दोन्ही गटातर्फे परस्परविरोधी तक्रार
विरावली ता.यावल येथे रविवारी दोन गटात शेतातील किरकोळ कारणा वरून दंगल घडली यात लिलाबाई पाटील यांच्या फिर्यादी नुसार शेतातील वाड्यात असतांना गावातील किशोर निळे याने यांच्या चार्याच्या कुटीवरुन ट्रॅक्टर नेले. याविषयी लिलाबाई यांनी विचारले असता त्याने त्यांना जीवे मारण्याची धमकी देली. यावर लिलाबाई यांचा मुलगा अतीक पाटील व प्रमोद पाटील यांनी किशोर निळे यास जाब विचारला असता त्याने व चेतन सुनिल धनगर, हेमत किशोर धनगर, सुनिल आत्माराम धनगर, आत्माराम दोधु धनगर अशा पाच जणांनी लिलाबाईसह त्यांच्या दोघं मुलाना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली म्हणुन पाच जणा विरूध्द दंगली सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसर्या गटातर्फेही तक्रार
याच कारणावरून तक्रारदार चेतन सुनील निळे यास विरावली गावातील संशयीत पिंटू गणेश पाटील, प्रमोद गणेश पाटील, विनोद हिरामण पाटील, विक्रम हिरामण पाटील व भैय्या भागवत पाटील या पाच जणांनी मारहाण केली. त्याच्या डोक्यास जबर दुखापत झाली. या पाच जणांविरूध्द दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार संजय देवरे, किशोर परदेशी करीत आहेत.