दुसखेडा शिवारातील शेतातून 55 हजारांचे धान्य लांबवले


फैजपूर : यावल तालुक्यातील दुसखेडा शिवारातील शेतातील पत्र्याच्या शेडमधून अज्ञात चोरट्यांनी गहू, कापूस मिळून 55 हजारांचा मुद्देमाल लांबवला. या प्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मुक्ताईनगर तालुक्यातील छायाचित्रकाराने विषारी द्रव प्राशन करीत केली आत्महत्या 

शेती साहित्याच्या चोरीने घबराट
नितीन दयाराम सोनवणे (38, दुसखेडा, ता.यावल) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्या असून शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. शेतातील सामान ठेवण्यासाठी त्यांच्या शेतात पत्र्याचे शेड आहे. रविवार, 17 एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता पत्र्याच्या शेडला कुलूप लावून ते घरी गेले होते. अज्ञात चोरट्यांनी पत्र्यांच्या शेडमध्ये ठेवलेला 10 क्विंटल गहू आणि तीन क्विंटल कापूस मिळून 55 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पत्र्याचे शेड तोडून लांबवला. शेतकरी नितीन सोनवणे हे सोमवारी सकाळी सात वाजता शेतात गेले त्यावेळी त्यांना पत्र्याचे शेडचे कुलूप तोडलेले दिसून आले. आत जावून पाहणी केली असात गहू आणि कापूस चोरून नेल्याचे लक्षात आले. त्यांनी फैजपूर पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक महेश वंजारी करीत आहे.


चाळीसगावात 13 लाखांचा गांजा जप्त : दोघांना अटक 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !