हिंगोण्यात समाजमंदिर खाली करण्यावरून वाद : महिलेसह मुलीला मारहाण


यावल : तालुक्यातील हगोणा येथील समाजमंदिर रीकामे करण्याच्या कारणावरून आठ जणांनी महिला व तिच्या मुलीला शिवीगाळ करून मारहाण केली तसेच वाद सोडवण्यासाठी आलेल्या महिलेच्या दिरावर हल्ला केला. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी फैजपूर पोलिसात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

विरावलीत शेतातील किरकोळ कारणांवरून दंगल : चौघे जखमी 

फैजपूर पोलिसात गुन्हा
हिगोंणा, ता.यावल येथील सुनीताबाई किरण भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्या गावातील जुने समाज मंदिरात समाजाच्या परवानगीने गेल्या चार महिन्यांपासून राहत होत्या. रविवारी सायंकाळी सात वाजता गावातील चेतन वसंत तायडे, अनिकेत वसंत तायडे, आकाश विनोद तायडे, अजय विनोद तायडे, सुर्यभान भागवत तायडे, सुनिता वसंत तायडे, प्रविण चरण तायडे व प्रशांत भागवत तायडे (सर्व रा. हिंगोणा) हे एकत्र येवून समाजमंदिर आत्ताच्या आत्ता खाली करा, असे बोलून त्यांनी फिर्यादीस व तीच्या मुलीस शिविगाळ केली. संसारोपयोगी वस्तू बाहेर फेकून नुकसान केले. दरम्यान, विवाहितेचा दीर रणजीत रमेश भालेराव हे भांडण सोडविण्यासाठी आले असता त्यांनादेखील जबर मारहाण करीत जखमी केले. जखमी रणजीत भालेराव यांच्यावर यावल ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. या प्रकरणी फैजपूर पोलिसात आठ जणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक फौजदार राजेश बर्‍हाटे करीत आहे.


महामार्ग लोकार्पणासह भूमिपूजनासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी 22 रोजी जळगाव जिल्ह्यात 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !