अंकलेश्वर-बर्‍हाणपूर महामार्गाचे 22 रोजी भूमिपूजन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची उपस्थिती : उपस्थितीचे पदाधिकार्‍यांना आवाहन


रावेर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते अंकलेश्वर-बर्‍हाणपूर महामार्गाच्या चौपदरीकरण कामाचे शुक्रवार, 22 रोजी भूमिपुजन होणार आहे. या सोहळ्याला जास्तीत-जास्त नागरीकांनी व पदाधिकार्‍यांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी सुरेश धनके यांनी केले आहे.

कुंपणानेच खाल्ले शेत : धुळ्यात कैद्यांच्या खात्यातील अधिक रक्कम कारागृह लिपिकाने हडपली 

दौर्‍यानिमित्त महत्वाची बैठक
रावेर शहरातील भाजपा कार्यालयात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दौर्‍यानिमित्त महत्वाची बैठक झाली. या बैठकीला माजी शिक्षण सभापती सुरेश धनके यांनी मार्गदर्शन केले. अंकलेश्वर-बर्‍हानपुर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे भूमिपूजन येत्या शुक्रवार, 22 एप्रिल रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते जळगाव येथे होणार आहे. या कार्यक्रमाला जास्तीत-जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे अहवान भाजपातर्फे करण्यात आले आहे. बैठकीला जि.प.चे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पदमाकर महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, पंचायत समिती सदस्य जुम्मा तडवी, पी.के.महाजन, भाजपा सरचिटणीस महेश चौधरी, माजी उपसभापती सुनील पाटील, महेश पाटील आदी कार्यकर्ते व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.


शहाद्यात उद्यापासून ‘युवारंग’ महोत्सवाची धूम 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !