दुचाकी चोरटे सुसाट : भुसावळ शहरातून दोन दुचाकी लंपास


भुसावळ : शहरातील दोन भागातून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी लांबवल्याची बाब उघडकीस आली. याबाबत भुसावळ बाजारपेठ आणि भुसावळ शहर पोलस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले.

दुचाकी चोरटे सुसाट
भुसावळ शहरातील नगरपालिका दवाखान्यात सागर हिरामण तायडे (23, रा. जामनेर) हे औषधी विभागात कंत्राटी कर्मचारी आहे. शनिवार, 16 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता त्यांनी दुचाकी (एम.एच. 19 सी.सी. 2935) ही दवाखान्याच्या आवारात पार्क केली मात्र चोरट्यांनी संधी साधून 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. याबाबत भुसावळ शहर पोलिस ठाण्यात ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जगन सोनवणे करीत आहे.


हिंगोण्यात समाजमंदिर खाली करण्यावरून वाद : महिलेसह मुलीला मारहाण 

वांजोळा रोड भागातूनही चोरी
दुसर्‍या घटनेत ऋषिकेश रामचंद्र शिंदे (21, विनायक कॉलनी, भुसावळ) हे कामाच्या निमित्ताने शहरातील वांजोळा रोड येथील स्टार हॉटेलच्या समोर आले असता दुचाकी (एम.एच.19 बी.पी.9788) पार्क केली व शनिवार, 16 एप्रिल रोजी रात्री 10.30 ते 11.30 दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुचाकी लांबवली. याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल जितेंद्र पाटील करीत आहे.

कुंपणानेच खाल्ले शेत : धुळ्यात कैद्यांच्या खात्यातील अधिक रक्कम कारागृह लिपिकाने हडपली 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !