फैजपूरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुतळ्याचे दहन
संविधान आर्मी व पीआरपीतर्फे राज ठाकरे यांच्या अटकेची मागणी
फैजपूर : शहरात संविधान आर्मी व पीआरपीतर्फे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अटकेच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले व राज ठाकरे यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
हनी ट्रॅपमध्ये अडकवत व्यावसायीकाला 44 लाखांचा गंडा
आंदोलनाने सर्वत्र उडाली खळबळ
फैजपूर शहरात संविधान आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन सोनवणे तसेच संविधान आर्मीचे प्रदेश अध्यक्ष राकेश बग्गन यांच्या नेतृत्वाखाली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अटकेच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. फैजपुर शहरात सुभाष चौक ते प्रांत कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुतळयाचे दहन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांकडून राज ठाकरे यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली गुन्हा दाखल करून त्वरीत अटक करावे, अशी मागणी करण्यात आली तसेच 1 मे महाराष्ट्र दिनी शासनाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे अटक न केल्यास मुंबईला जाऊन एक लाख कार्यकर्त्यांच्या संख्येने रेल रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

यांचा आंदोलनात सहभाग
या मोर्चामध्ये संविधान आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन सोनवणे तसेच संविधान आर्मीचे प्रदेश अध्यक्ष राकेश बग्गन, शेख आरीफ, शेख बिलाल, अज्जू शेख रामा चौधरी, गोपी साळी, बबलू शहा, शेख वसीम खाटीक यांच्यासह संविधान आर्मी व पीआरपीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
