भुसावळचे आमदार संजय सावकारे यांची कार पुन्हा परस्पर झाली नावावर
जळगाव : भारतीय जनता पक्षाचे भुसावळचे आमदार संजय सावकारे यांची कार परीवहनमंत्री अनिल परब यांच्या नावावर परस्पर हस्तांतरीत झाल्यानंतर आता ती परीवहन कार्यालयानेच पुन्हा सावकारे यांच्या नावावर करून दिली आहे मात्र या व्यवहारांमुळे नवी कार असूनही आमदार सावकारे त्या कारचे ‘सेकंड ओनर’ ठरल्याने कारचे बाजारमूल्यही कमी होणार आहे.
दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळविले : जळगावातील घटना
जळगाव आरटीओ कार्यालयाचा सावळा-गोंधळ
सावकारे यांची कार 28 डिसेंबर रोजी परस्पर अनिल परब यांच्या नावे करण्यात आली होती. त्यासाठी ऑनलाइन पोर्टलवरून प्राथमिक प्रक्रिया करण्यात आली. त्यावेळी खात्री करण्यासाठी पाठवला जाणारा पासवर्ड मिळवण्यासाठी अशोक पाटील या आरटीओ एजंटचा मोबाइल क्रमांक वापरला गेला. प्रत्यक्षात तयार झालेली कागदपत्रे जळगाव परीवहन कार्यालयातून कोणतीही शहानिशा न करता मंजूर करण्यात आली होती.
