नाशिक पोलिस आयुक्त दीपक पांडे यांची बदली : जयंत नाईकनवरे नवे नाशिकचे पोलिस आयुक्त


नाशिक : नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांची अखेर बदली झाली असून त्यांच्या जागी आयपीएस अधिकारी जयंत नाईकनवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, नाशिकचे विद्यमान आयुक्त पांडे यांची महिला अत्याचार प्रतिबंधक विभागात विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली.

लेटर बॉम्बमुळे आयुक्त पांडे चर्चेत
लेटरबॉम्बद्वारे राज्यात खळबळ उडवून दिल्याने नाशिक आयुक्त पांडे अधिक चर्चेत आले होते. राज्यातील महसूल विभागाचे अधिकार कमी करून ते पोलिस आयुक्तांना देण्यात यावे, अशी खळबळजनक मागणी त्यांनी केली होती तसेच हेल्मेट नसलेल्या वाहनचालकांना पेट्रोल दिल्यास पेट्रोल पंपचालकांवर कारवाई करण्याचा त्यांचा निर्णय वादग्रस्त ठरला. त्यामुळेच गुढीपाडव्याच्या दिवशी पंपचालकांनी नाशिक शहरात संप पुकारला. त्यातच पांडे यांनी खाजगी कारणास्तव राज्य सरकारकडे बदलीचा अर्ज केला होता. आता अखेर राज्य सरकारने त्यांची बदली केली आहे. नाशिकच्या कायदा आणि सुव्यवस्थेची धुरा जयंत नाईकनवरे यांच्याकडे देण्यात आली आहे.


 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !