प्रार्थनास्थळांवर ध्वनिक्षेपक लावण्यासाठी परवानगी बंधनकारकच : विशेष पोलिस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील
भुसावळ : नाशिक परीक्षेत्रातील पाचही जिल्ह्यातील मंदिर व मशीद किंवा अन्य धार्मिक स्थळांवर भोंगे लावायचे असल्यास पोलिस प्रशासनाची पूर्वपरवानगी बंधनकारक असून संबंधिताला अटी-शर्तींवर ही परवानगी मिळेल, अशी माहिती नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील यांनी दिली.
लाखाची देशी-विदेशी दारू लांबवली : भामटे एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात
उपद्रवींवर बारीक लक्ष
जातीय दंगली घडवणार्यांची मागील यादी काढली जात आहे. त्यातील संबंधितांवर यंत्रणा बारकाईने लक्ष ठेवेल. गरज वाटल्यास उपद्रवींवर प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल शिवाय प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत गोपनीय विभागाचे कर्मचारी सतर्क ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या असून सोशल मीडियाद्वारे समाजात तेढ निर्माण करणारे मेसेज हे फिरवले जात असल्याने अशा उपद्रवींवर पोलिसांचे बारकाईने लक्ष असून सायबर सेलद्वारे अशांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही ते म्हणाले.




