शिंदी जिल्हा परीषद शाळेतील शिक्षण दर्जेदार व संस्कारक्षम
मान्यवरांचा सूर ; जि.प शाळा शिंदीचा वर्धापनदिन उत्साहात
भुसावळ : तालुक्यातील शिंदी येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेचा 104 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील ज्येष्ठ नागरीक आणि शाळेचे माजी विद्यार्थी मोहनसिंग काशीराम चौधरी होते. प्रमुख उपस्थित म्हणून भुसावळ तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, किन्ही केंद्राचे केंद्रप्रमुख कमलाकर चौधरी, शिंदी गावच्या सरपंच नीता जाधव, उपसरपंच कैलास पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कांचन परदेशी, ग्रामपंचायत सदस्य दिलीप कोल्हे, माया कोल्हे, युनुस छप्परबंद, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य शीतल कोल्हे, चारुलता कोल्हे, जया कोळी, पूजा चौधरी, बन्सीलाल पाटील, माजी उपसरपंच सिद्धार्थ तायडे, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य संदीप सपकाळे, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष सुनील कोळी, गोकुळसिंग चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
जि.प.शाळेतील शिक्षण दर्जेदार : मोहन सिंग
जिल्हा परीषद प्राथमिक शाळेतून मिळणारे शिक्षण हे दर्जेदार आणि संस्कारमय असल्याचे यावेळी मोहन सिंग यांनी सांगितले. उपशिक्षक विलास पाटील यांनी शाळेने डॉक्टर, फौजदार, वकील, इंजिनिअर, प्राध्यापक, शिपाई, पोलीस, सैनिक, आरोग्य कर्मचारी, पाणीपुरवठा कर्मचारी, आयटीआय शिक्षक, प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, बँक कर्मचारी, ग्रामसेवक दिलेत. समाधान जाधव यांनी शाळेविषयी माहिती देताना सांगितले की, शाळेची स्थापना 18 एप्रिल 1918 रोजी झाली. पूर्वी शाळा ही साधी माती- भिंतीची होती. विद्यार्थ्यांना शेण आणून जागा सारवून त्यामध्ये वर्ग भरले जात होते. 1918 पासून ते 2022 पर्यंत बदललेले शाळेच्या प्रगती सांगताना शाळेमध्ये प्रत्येक वर्गात टीव्ही, कॉम्प्युटर, लॅपटॉप,फॅन, लाईट व्यवस्था आरो फिल्टर, बाल लायब्ररी, शाळेच्या आतील व बाहेरील आवारात शैक्षणिक चित्रे आहेत. शाळेतील विद्यार्थी व माजी विद्यार्थ्यांचीदेखील उपस्थिती होती. सूत्रसंचालन उपशिक्षिका मीनाक्षी पाटील यांनी केले. यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक भगवान बडगुजर, उपशिक्षिका प्रीती फेगडे यांनी परीश्रम घेतले. आभार उपशिक्षक समाधान जाधव यांनी मानले.
