ह.भ.प.जगन्नाथ महाराज अंजाळेकर यांच्या वारसांना चारचाकी भेट


भुसावळ : जळगाव जिल्ह्यात भागवत धर्माची पताका रोवण्यात अनेक संताचा अनमोल सहभाग आहे यात वै.ह.भ. प . जगन्नाथ महाराज अंजाळेकर यांना मानणारा वर्ग सर्वाधीक आहे. त्यांची परंपरा चालवणारे त्यांचे वारसा ह.भ.प. धनराज महाराज यांना त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री जगन्नाथ महाराज संस्थान अंजाळे, ता.यावल येथे 19 रोजी लाडू तुला करून चारचाकी वाहन मूळ गाडेगाव येथील व सध्या सुरत येथील रहिवासी असलेल्या राजेंद्र राणे यांनी अर्पण केली.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
ह.भ.प.जगन्नाथ महाराज यांचे वारस म्हणून ह.भ.प.धनराज महाराज हे संत परंपरा पुढे नेत आहेत. मंगळवार, 19 एप्रिल रोजी राजेंद्र लक्ष्मण राणे यांनी ह.भ.प. धनराज महाराज यांच्या वाढदिवसानिमित्ताने चारचाकी वाहन भेट देऊन बुंदी तुला कार्यक्रम आयोजित केला. प्रसंगी ह.भ.प.महामंडलेश्वर जनार्दन महाराज, रवींद्र भैय्या पाटील, जळगाव आमदार राजूमामा भोळे, रावेरचे आमदार शिरीष चौधरी, भुसावळ नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष नितीन धांडे, माजी नगरसेवक किरण कोलते, डॉ.कुंदन फेगडे, ह.भ.प.भरत महाराज (झेंडुजी संस्थान बेळी), ह.भ.प.रमेश महाराज (आडविहिर), ह.भ.प.दुर्गादास महाराज (चिनावल), ह.भ.प.भरत महाराज (म्हैसवाडी), ह.भ.प.तोताराम महाराज समाधी ट्रस्ट गाडेगाव व गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते. प्रसंगी ह.भ.प.रवींद्र महाराज हरणे (मुक्ताईनगर) यांचे कीर्तन झाले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !