यावल शहरात दुकानदारावर हल्ला
यावल : नाईट पँट बदलून न दिल्याने शहरातील दुकानदारासह त्याच्या भावावर हल्ला करण्यात आला. ही घटना गुरुवारी दुपारी घडली. या प्रकरणी यावल पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या व्यापारी संकुलात राहुल मधुकर बडगुजर यांचे परीधान कलेक्शन हे दुकान असून एकाने आठ दिवसांपूर्वी नाईट पँट घेतली व पँट फाटल्याने ती घेवून संशयीत दुकानात आला मात्र अशी पँट बदलता येत नाही, असे सांगितल्यानंतर काही वेळेने संशयीतांनी राहुल बडगुजर व त्यांचा लहान भाऊ अक्षय यांना मारहाण करीत नासधूस केली.