केंद्रीय वाहतूक व रस्ते मंत्री नितीन गडकरी नितीन गडकरी आज जळगावसह धुळ्यात
जळगाव जिल्ह्यातील 199 किलोमीटर लांबीच्या 2153 कोटी रुपये खर्च झालेल्या राष्ट्रीय महामार्गांचे लोकार्पण होणार
Nitin Gadkari जळगाव केंद्रीय वाहतूक व रस्ते मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे शुक्रवारी जळगाव व धुळे दौर्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत जळगाव जिल्ह्यातील 199 किलोमीटर लांबीच्या 2153 कोटी रुपये खर्च झालेल्या राष्ट्रीय महामार्गांचे लोकार्पण होणार आहे. दरम्यान, धुळ्यातील राजर्षी शाहू महाराज नाट्यमंदिरात राष्ट्रीय महामार्गाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. जळगावात जी.एस. मैदानावर सायंकाळी 5.45 वाजता राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा होणार आहे.
राज्यातील भारनियमनाबाबत ऊर्जामंत्र्यांनी केली ही घोषणा
या कामांचे होणार लोकार्पण
चिखली तरसोद महामार्गाचे चौपदरीकरण, जळगाव शहरातून जाणार्या महामार्गाचे चौपदरीकरण, भडगाव-चाळीसगाव रस्त्याचे दुपदरीकरण, पहूर, जामनेर, बोदवड, मुक्ताईनगर महामार्ग दुहेरीकरण, अमळनेर ते चोपडा राज्य महामार्ग 15 मधील रेल्वे उड्डाणपूल यांचे लोकार्पण होणार आहे.


भाजपा पदाधिकार्यांची बैठक
शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे धुळे येथून जळगावला येणार आहेत. त्यानंतर दुपारी 5 वाजता ते भाजप कार्यकर्त्यांची बैठक घेतील. त्यानंतर 5.45 वाजता राष्ट्रीय महामार्गाच्या कामांचे लोकार्पण करतील व नंतर 7 वाजता ते विमानाने नागपूरकडे जाणार आहेत.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, महापौर जयश्री महाजन, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेश पाटील, शिक्षक आमदार सुधीर तांबे यांच्यासह जिल्ह्यातील सर्वच आमदार उपस्थित असतील.
महिलेसह चार नक्षलवादी गडचिरोली पोलिसांच्या जाळ्यात


