फोन टॅपिंग प्रकरणात नवीन गौप्यस्फोट ; खडसेंसह राऊतांसाठी टोपण नावांचा केला वापर


New leak in phone tapping case; Use of nicknames for Rauts including Khadse मुंबई : खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि माजी मंत्री एकनाथराव खडसे (Eknathrav Khdase) यांचे फोन टॅप करताना टोपण नावे वापरण्यात आल्याची बाब उघड झाली आहे. चौकशीतून एक मोठा गौप्यस्फोट झाला आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतांना राज्यातील काही राजकारण्यांचे फोन टॅप करण्यात आल्याचे प्रकरण आता गंभीर वळणावर आल्याचे दिसून येते. या प्रकरणी आधीच कुलाबा पोलीस स्थानकात तत्कालीन पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबाद-मुंबई देवगिरी एक्सप्रेसवर सशस्त्र दरोडा 

अनेकांचे नोंदवले जवाब
या प्रकरणात आतापर्यंत संजय राऊत आणि माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आपले जबाब नोंदविले असून सोबत सहा साक्षीदारांचेही जबाब घेण्यात आले आहेत. या प्रकरणी सुरू असलेल्या चौकशीतून आता नवीन धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. या प्रकरणात सहभागी असणार्‍या इतर पोलिस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार राऊत आणि खडसे यांच्या फोन टॅपींगचे निर्देश देतांना त्यांच्याच नावाचे साधर्म्य असणारी पण बनावट नावे वापरण्यात आल्याची माहिती या पोलिस अधिकार्‍यांनी दिली आहे. यानुसार संजय राऊत यांच्यासाठी एस.रहाटे तर एकनाथराव खडसे यांच्यासाठी खडसणे हे नाव वापरण्यात आले. टोपण नावे वापरून संजय राऊत आणि एकनाथराव खडसे यांचे फोन टॅपींग करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी आता नेमकी कुणा-कुणावर काय कारवाई होते ? याकडे राज्याचे लक्ष लागल आहे.






रावेर तालुक्यातील शौचालय घोटाळ्याची व्याप्ती प्रचंड मोठी : माजी मंत्री एकनाथराव खडसे 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !