रावेरात ‘आकोडेबाज’ वीज चोरट्यांवर वीज कंपनीची धडक कारवाई


रावेर : वीज वितरण कंपनीचे वीज मीटर न घेता वीज तारांवर आकोडे टाकून वीज चोरी करणार्‍यांविरोधात शुक्रवारी वीज कंपनीने धडक मोहिम राबवल्याने विजेची चोरी करणार्‍यांच्या गोटात खळबळ उडाली. तब्बल 30 जणांवर ही कारवाई करण्यात आली. विजेची चोरी करणार्‍यांना दोन दिवसात त्यांच्या वीज वापरानुसार दंडात्मक कारवाई केली जाणार आहे व दंड न भरल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती सहाय्यक अभियंता दिलीप सुंदराणी यांनी दिली.

यांच्या पथकाने केली कारवाई
वीज वितरण कंपनीचे सावदा येथील कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर उपकार्यकारी अभियंता अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अभियंता दिलीप सुंदराणी, प्र.तंत्रज्ञ बी.सी साळुंके यांच्यासह कलिंदर तडवी, उत्तमगीर गोसावी, तुषार चौधरी, धनंजय पाटील, अमोल हिवरे, सतीष सांगळे, चेतन भारते, अरुण माळी, कल्पेश पाटील, समीर तडवी, नजरखान जाबीरखान, दीपक पाटील आदींनी कारवाई केली.


यापुढे नियमित तपासणी होवून कारवाई होणार
वीज वितरण कंपनीतर्फे शुक्रवारी शहरातील विविध भागात राबवलेल्या मोहिमेत वीजचोरी करणार्‍या 30 जणांवर कारवाई करण्यात आली व त्यांच्या घरातून मोठ्या प्रमाणावर आकोडे, वायर्स जप्त करण्यात आल्या. दरम्यान, संबंधितांवर वीज चोरी केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई होणार असून त्यानंतरही दंड न भरल्यास गुन्हे दाखल केले जाणार आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !