पुर्नवसनाबाबतच्या अडचणींची आमदार चंद्रकांत पाटील यांनी जाणली माहिती


मुक्ताईनगर : मतदार संघातील रखडलेल्या पुनर्वसन संदर्भात मंगळवारी पुनर्वसन मंत्र्यांच्या दालनात महत्वपूर्ण बैठक होत आहे. या पार्श्वूमीवर मतदारसंघातील अनेक गावातील प्रमुख पदाधिकारी, ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरीक तथा गाव कारभार्‍यांची महत्वपूर्ण बैठक शनिवारी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी झाली. विविध गावातील पुनर्वसन संदर्भातील समस्या, अडचणींवर सखोल चर्चा करण्यात आली. त्याबाबत प्रस्ताव तयार करून त्या अनुषंगाने बैठकीसाठी पूर्व तयारी करण्यात आली.

ट्रक चालकासह क्लिनरला मारहाण करीत लूट : दहा जणांविरोधात गुन्हा 

गावनिहाय पदाधिकार्‍यांशी केली चर्चा
यावेळी आमदार चंद्रकात पाटील यांनी गावनिहाय पदाधिकार्‍यांशी चर्चा करून त्यांचे विविध विषय नमूद करून घेतले व जिल्हा पुनर्वसन अधिकारी, जलसंपदा अधिकारी यांच्याशी त्या-त्या गावातील समस्या व अडचणींसंदर्भात भ्रमणध्वनी वरून चर्चा केली. बैठकीत तांदलवाडी, मांगलवाडी, आंदलवाडी, सुलवाडी, पुरी गोलवाडा, शिंगाडी, सुलवाडी, कांडवेल, निंबोल, ऐनपूर, उचंदा, मेंढोळदे, मेळसांगवे, पंचाणे, शेमळदे, बेलसवाडी, भोकरी, धामणदे, नरवेल, अंतुर्ली आदी गावातील रखडलेल्या पुनर्वसन व नागरी सुविधा यावर चर्चा करण्यात आली तर मुक्ताईनगर शहरातील रखडलेल्या चौथ्या टप्प्यातील पुनर्वसन व तिसर्‍या टप्प्यातील अनेक भूखंड वाटपात अनेक नागरीक यांच्यावर अन्याय झाल्याने त्यांच्या ही समस्येबाबत चर्चा करण्यात आली.


दोंडाईचानजीक केशरानंद जिनिंगला भीषण आग : 80 लाखांचे नुकसान 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !