पोलिस कोठडीत मारहाणीत संशयीत आरोपीचा मृत्यू : पोलिस निरीक्षकांसह सात जणांविरोधात गुन्हा


सोलापूर : चोरीच्या गुन्ह्याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या आरोपीचा पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याने तत्कालीन पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक यांच्यासह सात जणांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीत सहायक पोलीस निरीक्षकासह सहा जणांनी गुन्हा कबूल करण्यासाठी मारहाण केल्याचा आरोप आहे.

यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
वरीष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह शामराव पाटील (सध्या नेमणूक फौजदार चावडी पोलीस ठाणे), सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार मारुती कोल्हाळ, हवालदार श्रीरंग तुकाराम खांडेकर, पोलीस नाईक शिवानंद दत्तात्रय भीमदे, पोलीस नाईक अंबादास बालाजी गड्डम, पोलीस शिपाई आतिश काकासाहेब पाटील, पोलीस नाईक लक्ष्मण पोमू राठोड (सर्व नेमणूक विजापूर नाका पोलीस ठाणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.


खासदार नवनीत राणांसह आमदार रवी राणा यांना पोलिसांकडून अटक

गुन्हा कबुल करण्यासाठी मारहाणीचा आरोप
मयत आरोपी भीमा रज्जा काळे (42, रा. भांबुरे वस्ती, पारधी वस्ती, कुर्डूवाडी, ता. माढा) हा एका गुन्ह्यात जिल्हा कारागृहात होता. विजापूर नाका पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी 22 सप्टेंबर 2021 रोजी भीमा काळे याला कारागृहातून वर्ग करून ताब्यात घेतले होते. न्यायालयाकडून 22 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर 2021 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करून घेतली होती. पोलीस कोठडीत असताना भीमा काळे याला सर्दी, ताप, खोकला व उलट्या होत होत्या. त्याच्या पायाला कशाचा तरी संसर्ग झाल्यामुळे सूज आली होती. भीमा काळे याला उपचारासाठी 24 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 2.25 वाजता मेडिकल यादीने सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्याचा 3 ऑक्टोबर 2021 रोजी मृत्यू झाला होता. या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात सीआरपीसी कलम 174 प्रमाणे मयत म्हणून नोंद करण्यात आली होती. दरम्यान, गुन्हा उघडकीस आणण्यासाठी संशयीत आरोपीला मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.

यावल शहरातील अविवाहित तरुणाची आत्महत्या 

गुन्हे अन्वेषण विभागाकडे तपास
सात जणांविरुद्ध वैद्यकीय मदत न पुरवता त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी भादंवि कलम 304, 330, 166, 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. तपास पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभाग भरारी पथकाचे डीवायएसपी जी.व्ही.दिघावकर करीत आहेत.

एरंडोल शहरातील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !