भरधाव रीक्षाच्या धडकेत डांभूर्णीतील भाजीपाला विक्रेता महिला जखमी


यावल : रस्त्याने पायी जात असलेल्या डांभूर्णीतील भाजीपाला विक्री करणार्‍या महिलेला ऑटो रिक्षाची जोरदार धडक दिल्याची घटना घडली. यात महिला गंभीर जखमी झाल्या. याबाबत यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एरंडोल तालुक्यातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले ; एकाविरोधात गुन्हा

ऑटो रीक्षाच्या धडकेत महिला जखमी
प्रमिला माधव कोळी (54, डांभूर्णी, ता.यावल) या भाजीपाला विक्री करून आपला उदरनिर्वाह करतात. बुधवार, 20 एप्रिल सायंकाळी पायी भाजीपाला विक्री करत असतांना भरधाव ऑटो रीक्षा (एम.एच.19 सी.डब्ल्यू.2379) ने त्यांना जोरदार धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. शनिवार, 23 एप्रिल रोजी महिलेच्या फिर्यादीवरून ऑटो रीक्षेवरील अज्ञात चालकाविरोधात यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार अजीज शेख करीत आहे.


खासदार उन्मेश पाटील यांचे ट्विटल हॅण्डल हॅक


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !