बोदवड शहरातील मिरची कांडप कारखान्याला आग : 30 लाखांचे नुकसान
बोदवड : शहरातील मलकापूर रोडवरील खंडेलवाल पेट्रोल पंपामागील देवराम कडू माळी यांच्या मिरची कांडप कारखान्याला शनिवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने सुमारे 30 लाखांचे नुकसान झाले.
शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा अंदाज
देवराम माळी यांचा कोरडी मिरची कांडप करून त्यापासून चटणी तयार करण्याचा कारखाना असून शुक्रवारी येथे चार गावातील मिरची व्यापार्यांसह कारखाना मालक आणि त्यांचे भाऊ शांताराम माळी यांची मिरची कांडपासाठी आणण्यात आली मात्र देवराम माळी यांच्या मुलाला शनिवारी हळद लागल्याने कारखाना बंद असताना रात्री आठला आग लागली. दरम्यान, आगीत गॅस हंडी फुटल्याचा अंदाज आहे. आग धगधगत असताना शहरातील नागरीकांनी टँकरद्वारे पाणी मारून आग विझवण्याचा प्रयत्न केला. जामनेर येथूनही अग्निशमन दलाचा बंब बोलावण्यात आला.


हनुमान चालीसा पठण करणे गुन्हा असल्यास फाशी द्यावी : नवनीत राणा
नगरपंचायतीकडे नाही अग्निशमन बंब
बोदवड शहरात दहा कापूस जिनिंगसह छोट्या-मोठ्या अशा औद्योगिक फॅक्टरी आहेत मात्र बोदवड नगरपंचायत स्वतःची अग्निशामक दलाची गाडी नसल्याचे शहरवासीयांचे दुर्दैव आहे. आग लागल्यानंतर जामनेर वा मलकापूर येथून अग्निशमन बंबाला पाचारणा करावा लागतो मात्र त्यात दिड ते दोन तासांचा अवधी जात असल्याने आगीचा विळखा पसरून मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. बोदवड नगरपंचायतीने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा


