भाजपा नेते किरीट सोमय्यांवर हल्ला : माजी महापौरांसह तिघा नगरसेवकांना अटक
मुंबई : भाजपा नेते किरीट सौमय्या यांच्यावरील हल्ला प्रकरणात माजी महापौर, तीन नगरसेवक यांच्यासह काही शिवसैनिकांवर गुन्हा दाखल असून या हल्ल्याप्रकरणी विश्वनाथ महाडेश्वर, हाजी खान, चंद्रशेखर वैगणकर, दिनेश कुबल चार जणांना अटक करण्यात आली.
सोमय्यांच्या वाहनावर फेकल्या चपला
भाजपा नेते किरीट सोमय्या हे राणा दाम्पत्याची भेट घेण्यासाठी शनिवार, 23 एप्रिल रोजी खार पोलीस स्टेशनमध्ये गेले असता पोलिस स्टेशनमधून परत जात असताना किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत बाटल्या आणि चपला फेकल्या. यावेळी सोमय्या यांच्या गाडीची काच फुटली होती तर सोमय्या या हल्ल्यात जखमी झाले. यावेळी माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर देखील उपस्थित होते.

जीवे मारण्याच्या हेतूने हल्ला
किरीट सोमय्यांवर जीवे मारण्याच्या हेतूने हा हल्ला झाल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे तर सोमय्यांच्या वाहनचालकाने शिवसैनिकांवर गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप महाडेश्वर यांनी केला आहे.