यावल तालुक्यातील प्रौढाची गळफास घेवून आत्महत्या
यावल : यावल तालुक्यातील चिखलीच्या 42 वर्षीय प्रौढाने गळफास घेतला. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सुभाष चावदस लासूरे (42, धनगरवाडा, चिखली खुर्द, ता.यावल) असे मयताचे नाव आहे.
सिंधी कॉलनीतील बंद घरातून पाच लाखांचा मुद्देमाल लंपास
झाडाला घेतला गळफास
शनिवार, 23 एप्रिल रोजी सुभाष लासूरे हे सायंकाळी कुणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेले होते. त्यांच्या कुटुंबियातील सदस्यांनी परीसरात शोधाशोध केली ते कुठेही आढळून आले नाही. रविवार, 24 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता त्यांनी शेतातील निंबाच्या झाडाला बागायती रूमालाने गळफास घेवून आत्महत्या केली. यावल ग्रामीण रुग्णालयात लासुरे यांना दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस नाईक किशोर परदेशी करीत आहे.
