राणा दाम्पत्यावर हल्ला करणार्‍यांवर कठोर कारवाई हवी

युवा स्वाभिमान पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यांचे वरणगाव पोलिसांना निवेदन


वरणगाव : मुंबईसह अमरावती येथे खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्यावर हल्ला करण्यात आल्याच्या घटनेचा निषेध युवा स्वाभिमान पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यांनी केला असून दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी वरणगाव पोलिसांना निवेदन देण्यात आले.

दोषींवर हवी कारवाई
निवेदनाचा आशय असा की, हल्लेखोरांवर कारवाई करावी तसेच सोशल मिडीयावरील पेजवर अश्लील कॉमेंटस करणार्‍यांवर गुन्हा दाखल करावा अन्यथा दोन दिवसात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महेंद्र पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !