भारनियमनाबद्दल वरणगावकरांची भाजपने दिशाभूल करू नये
शिवसेना शहरप्रमुख संतोष माळी यांचा पत्रकाद्वारे इशारा
वरणगाव : कठोरा येथील वरणगाव शहरासाठी पाणीपुरवठा करणार्या जॅकवेलवर वीज वितरण कंपनीतर्फे अधिक प्रमाणात भारनियमन केले जाते. ते भारनियमन रद्द करावे या मागणीसाठी भाजपने सोमवारी आंदोलन सोमवारी केले परंतु गेल्या चार ते पाच दिवसापासून कठोरा येथे कुठल्याही प्रकारचे भारनियमन होत नसल्याने भाजपवाल्यांनी वरणगाववासीयांची भारनियमनाच्या नावाखाली दिशाभूल करू नये, असा इशारा वरणगाव शिवसेना शहरप्रमुख संतोष माळी यांनी दिला आहे.
सर्वात आधी शिवसेनेने उचलला होता आवाज
काही दिवसांपूर्वी सण-उत्सवांच्या काळात वरणगावात 12 ते 15 दिवसांनी पिण्याचे पाणी मिळत होते. या संदर्भात शनिवार, 9 एप्रिल रोजी सर्वात अगोदर शिवसेनेच्या वतीने आपण नगरपालिका गाठून अधिकार्यांना यासंदर्भात जाब विचारल्याचे माळी यांनी कळवले आहे. दरम्यान, राज्यात विना खंडित वीजपुरवठा सुरू असल्याचा दावा वरणगाव महावितरणचे सहाय्यक उप अभियंता यु.डी.पाटील यांनी केला मात्र चमकोगिरीसाठी भाजपाने ठिय्या आंदोलन केले व तेही जनतेची दिशाभूल करण्यासाठी, असा खळबळजनक दावा संतोष माळी यांनी केला आहे.

वरणगावात भारनियमन रद्दसाठी भाजपाचे ‘ठिय्या’ आंदोलन
यांची होती उपस्थिती
भाजपाच्या आंदोलनानंतर सायंकाळी शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी वीज वितरण कार्यालय गाठून सहाय्यक अभियंता यु.डी.पाटील यांना भारनियमन बंद असल्याचा खुलासा करण्यास सांगितले. यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख सुभाष चौधरी, शहरप्रमुख संतोष माळी, ज्येष्ठ शिवसैनिक सुरेश चौधरी, युवा सेनेचे युवा जिल्हाधिकारी चंद्रकांत शर्मा, आबा सोनार, विलास वंजारी, सुनील देववाटोळे, सागर वंजारी, वैभव लोखंडे, दीपक शेळके, अतुल पाटील, कालू शर्मा उपस्थित होते.