भुसावळातील मोक्का कारवाईतील संशयीत न्यायालयात हजर न झाल्यास मालमत्ता होणार जप्त
पसार संशयीतांच्या घराला पोलिसांनी डकवली नोटीस : कारवाईने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ
भुसावळ : मोक्का प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर सात संशयीत पसार झाल्याने त्यांच्या मुसक्या बांधण्यासाठी पोलिस प्रशासनाने कंबर कसली आहे. मोक्का प्रकरणातील निखील राजपूतसह सात संशयीत 19 मे 2022 पर्यंत अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर न झाल्यास सीआरपीसी कलम 83 प्रमाणे त्यांच्या संपत्तीवर टाच आणण्यात येणार आहे. अशा पद्धत्तीने कारवाई झाल्यास ती शहरातील पहिलीच कारवाई ठरणार असल्याने पोलिसांच्या कठोर भूमिकेने गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
भीषण अपघातात एरंडोलच्या सासु-जावयासह तिघे ठार
मोक्कातील संशयीत पसार
शहरातील निखील सुरेश राजपूत (28, रा.दत्त नगर, श्रीराम नगर, वांजोळा रोड, भुसावळ), अक्षय प्रताप न्हावकर उर्फ थापा (24, रा.चक्रधर, रोटरी हॉलजवळ, भुसावळ), नकुल थानसिंग राजपूत (28, चंदाबाई सोसायटी, आंबेडकर वस्तीगृहाजवळ, भुसावळ), आकाश गणेश पाटील (23, नारायण नगर, शिवपूर कन्हाळा रोड, भुसावळ), अभिषेक राजेश शर्मा (21, चमेली नगर, वांजोळा रोड, भुसावळ), निलेश चंद्रकांत ठाकूर (21, श्रीराम नगर, दत्त मंदिराजवळ, भुसावळ), चेतन संतोष पाटील (21, श्रीराम नगर, वांजोळारोड भुसावळ) या सात जणांविरूध्द मोक्काचा प्रस्ताव मंजूर असून पोलिसांच्या कारवाईपूर्वीच संशयीत पसार झाले आहेत.




