भुसावळात पाणपोईचे आमदार सावकारे यांच्याहस्ते उद्घाटन


भुसावळ : बदलत्या काळानुसार पाणपोई सेवेने आपला लूक बदलला आहे. रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीच्या थंडगार जार पाणपोईचे नुकतेच आमदार संजय सावकारे यांनी उद्घाटन केल्याने वाटसरूंसह नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शहरातील पांडुरंग टॉकीजजवळील रीक्षा व बस थांब्याशेजारी रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीतर्फे जार पाणपोई उभारण्यात आली असून त्यासाठी एक लोखंडी रॅक उभारण्यात आले आहे. दररोज 25 थंडगार पाण्याचे जारचा पुरवठा होणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

चोरवडजवळ दुचाकी अपघातात तिघे जखमी : माजी नगरसेवक निर्मल कोठारींची सतर्कता

यांची होती उपस्थिती
यावेळी सचिव आशीष अग्रवाल, विकास पाचपांडे, डॉ.मकरंद चांदवडकर, सोनु मांडे, आशीश पटेल, अरविंद वारके, डॉ.प्रवीण वारके, विशाल शाह, रणजीत खरारे, महेश चौधरी तसेच मिनीडोअर चालक मालक संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. दम्यान, थंडगार जार पाणपोईचा उपक्रम किमान उन्हाळ्याचे चार महिने सुरू राहणार असून बाजाराच्या ठिकाणी जेथे पाणपोई नाही तेथेही जार पाणपोई सुरू करण्याचा क्लबचा विचार असल्याचे रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीचे अध्यक्ष हरविंदरसिंग ठेठी म्हणाले.


भुसावळचे आमदार संजय सावकारे स्पष्टच म्हणाले ; राष्ट्रवादीकडून अनेकदा ऑफर मात्र भाजपा कदापि सोडणार नाही !


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !