भुसावळात श्री स्वामी पुण्यतिथीनिमित्त अखंड नाम-जप-यज्ञ सप्ताह


भुसावळ : श्री स्वामी पुण्यतिथी निमित्त उत्सव 22 ते 28 एप्रिल दरम्यान मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा झाला. भुसावळ येथील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा केंद्र व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) नंदनवन कॉलनीत हा उत्सव झाला. उत्सवाची सांगता सत्य दत्त पूजन, महा आरती, महा नैवेद्य करून झाली. या सप्ताह काळात शहर व ग्रामीण भागातील शेकडो सेवेकरी काका मावशी व ताई, भाऊ सेवेकरी यांनी विविध सेवा श्री स्वामी पुण्यतिथी निमित्त ऑनलाईन व प्रत्यक्षपणे सेवा रुजू केल्या. त्यात प्रामुख्याने अखंडपणे सप्ताह कालावधीत विविध सेवा रुजू केल्या.

विविध सेवा रूजू
अखंड प्रहर सेवा, श्री गुरुचरित्र पारायण- केंद्रात 52 पारायण, ऑनलाईन स्वरुपात घरी गुरुचरित्र पारायण 150 पाठ, श्री स्वामी समर्थ मंत्र जप 19 लाख 49 हजार , 107 करण्यात आले. नवार्णव मंत्र जप- 88 हजार 665, गायत्री मंत्र जप 18 हजार 576, महामृत्युंजय मंत्र जप 14 हजार 65, श्री स्वामी चरित्र सारामृत – 147 पाठ, श्री दुर्गा सप्तशती पारायण 255 पाठ. अशा सेवा झाल्या. अशा प्रकारच्या विविध सेवा अखंडपणे भाविक भक्तांनी या सप्ताहात भावपूर्ण व श्रद्धेने भक्तिमय वातावरणात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नाम जप यज्ञाचा जयघोष करीत सांगता झाली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !