भुसावळ-जामनेर-पहुर मार्गाचे चौपदरीकरण करा

कुर्‍हा सरपंच जीवन पाटील यांची मागणी


भुसावळ : केंद्र शासनाने भुसावळ-जामनेर-पहूर या सध्याच्या राज्यमार्ग क्रमांक 44 रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन रुंदीकरण व चौपदरीकरण करावे, अशी मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे कुर्‍हा सरपंच जीवन पाटील व उपसरपंच विलास रंदाळे व ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे.

तर गावांचा होणार विकास
भुसावळ हे रेल्वे जंक्शन असल्याने भुसावळात रेल्वेने उतरून अजिंठा लेणीला जाणार्‍या पर्यटकांना हा रस्ता सोयीचा व जवळचा आहे. जपान सरकारने यापूर्वी अजिंठा भुसावळ रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग करण्याचा मानस व्यक्त केला होता व तसेच निधीची सुद्धा उपलब्धता करून दिली होती मात्र
पहुर-जामनेरपर्यंत हा रस्ता चारपदरी झाला जामनेर-भुसावळ हा रस्ता चारपदरी झालेला नाही. कित्येक वर्षापासून या रस्त्याच्या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा व मागणी केली आहे तसेच भुसावळ-जामनेर रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे आंदोलनसुध्दा करावे लागले तसेच नशिराबाद- बोदवड- मलकापूर हा मार्ग सुद्धा चारपदरी केला तर या मार्गावर असलेल्या गावांचा सुद्धा विकास होईल. या मार्गावर रहदारी वाढुन मलकापुर हे अंतर जवळ होईल. त्यामुळे इंधन, वेळेची सुद्धा बचत होईल, अशी अपेक्षा निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !