वंचित बहुजन आघाडीतर्फे उद्या सद्भावना रॅली


भुसावळ : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय वंचित अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर व प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांच्या आवाहनानुसार महाराष्ट्रात शांतता, सद्भावना व राष्ट्रीय एकात्मता टिकून राहण्यासाठी पक्षाच्या वतीने महाराष्ट्रभर रविवार, 1 मे रोजी शांतता रॅली काढण्यात येणार आहे.

रॅलीत सहभागाचे आवाहन
अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीच्या वतिने देखील भुसावळ शहरात सायंकाळी सहा वाजता अष्टभुजा मंदिरासमोरुन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पर्यंत शांतता रॅली काढण्यात येणार आहे. जातीय सलोखा, राष्ट्रीय एकात्मता टिकवण्यासाठी या शांतता रॅलीत संघटनेच्या सर्व पदाधिकार्‍यांसह सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, जिल्हा महासचिव दिनेश इखारे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदना सोनवणे, महिला आघाडी जिल्हा महासचिव वंदना आराक, जिल्हा संघटक अरुण तायडे, जिल्हा कोषाध्यक्ष अरुण नरवाडे, भुसावळ शहराध्यक्ष गणेश जाधव, भुसावळ शहर महासचिव देवदत्त मकासरे मेजर, गौतम लोखंडे यांनी केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !