यावल तालुक्यातील अल्पवयीन बालिकेवर अत्याचार : एकाला टक


यावल : तालुक्यातील एका गावातुन १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे तरूणाने अपहरण केले व तिला आपल्या एका नातेवाईकाच्या मदतीने नाशिक येथे नेल्यानंतर नातेवाईक दाम्पत्याच्या घरी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. चार दिवसात पीडीता घरी परतली व रविवारी १ मे रोजी चार जणांविरूध्द पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. एका आरोपीला अटक करण्यात आली असून अन्य तिघा आरोपींचा कसून शोध सुरू आहे.

चौघांविरुद्ध पोस्को अन्वये गुन्हा
तालुक्यातील एका गावातुन १६ वर्षीय तरूणीचे २७ एप्रिल २०२२ रोजी पहाटे गावातील तरूण चंद्रकांत उर्फ भुषण आत्माराम सोनवणे (कोळी) याने महेंद्र कोळी (आसोदा, ता.जळगाव) यांच्या मदतीने अपहरण केले व त्या अल्पवयीन मुलीस नाशिक येथील नातेवाईक दीपाली जितेंद्र कोळी व जितेंद्र कोळी यांच्या घरी नेत बालिकेवर अत्याचार केला. चार दिवस अल्पवयीन पीडिता नाशिक येथे होती व रविवारी ती घरी परतली. घडलेली घटना कुटुंबास सांगितली. यापुर्वी या अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा गुन्हा यावल पोलिसात दाखल होता. अल्पवयीन मुलगी घरी पतल्याचे समजताच पोलिसांनी अल्पवयीन व चंद्रकांत उर्फ भुषण सोनवणे (कोळी) यास ताब्यात घेतले. आरोपी भूषणसह महेंद्र कोळी, नाशिक येथील जितेंद्र व दीपाली कोळी या चौघांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. भुषण सोनवणे (कोळी) यास अटक करण्यात आली आहे तर इतर तिघांच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. पुढील तपास यावलचे प्रभारी अधिकारी आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर, सहाय्यक फौजदार अजीज शेख, हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !