सोपान नगरात घर जळाले : संसार आला उघड्यावर


जळगाव : शहरातील सत्यम पार्कजवळील सोपान नगरात घराला आग लागल्याने संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. या घटनेत 20 हजार रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिसात आगीची नोंद करण्यात आली.

संतापजनक ! : पती व मुलांसमोरच विवाहितेवर रेल्वे स्थानकावरच नराधमांचा गँगरेप 

तालुका पोलिसात नोंद
शहरातील सत्यम पार्कमधील सोपान नगरात सुनीता शरद पाटील या वास्तव्यास आहेत. 27 रोजी रात्री 8 ते 29 रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान त्यांच्या घराला आग लागली. या आगीत घरातील भांडे, कपडे, लाकडी पलंग, गादी यासह संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. या घटनेत सुमारे 20 हजार रुपयांचे नुकसान झाले. अग्निशामन विभागाच्या बंबाने ही आग आटोक्यात आणली. या प्रकरणी सुनीता पाटील यांच्या खबरीवरुन तालुका पोलिसात आगीच्या घटनेची नोंद करण्यात आली.



सातारा जिल्ह्यातील दाम्पत्यासह तिघांचा संशयास्पद मृत्यू 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !