raj thackeray मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अडचणीत वाढ : औरंगाबादमधील सभेप्रकरणी अखेर गुन्हा


raj thackeray औरंगाबाद : पोलिसांनी घालून दिलेल्या अटींसह शर्थींचे उल्लंघण केल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांच्यासह सभेचे आयोजक राजीव जावळीकर यांच्या विरोधात औरंगाबाद येथील सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

लग्न मिरवणुकीत चप्पल घेवून नवरदेवामागे धावली प्रेमिका ; अन् घडले असे काही…!

अटींचे उल्लंघण केल्याने गुन्हा
1 मे रोजी राज (raj thackeray) यांची जाहीर सभा औरंगाबाद शहरात झाली. या सभेत राज यांनी धार्मिक किंवा सामाजिक तेढ निर्माण होईल, असे कुठलेही भाष्य करु नये, असे पोलिसांनी बजावले होते. मात्र, राज यांनी मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला. तसेच, 3 मे पर्यंत भोंगे हटवावेत. अन्यथा त्याच मशिदींसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालिसा लावण्याचा इशारा राज यांनी या सभेत दिला. याद्वारे राज यांनी पोलिसांच्या अटी-शर्थींचे उल्लंघण केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. राज यांचे संपूर्ण भाषण ऐकून पोलिसांनी अखेर सिटी चौक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.



पैसे पडल्याचे सांगून सावद्यात लाखाची रोकड धूम स्टाईल लांबवली

सभेसाठी या होत्या अटी
– ध्वनी प्रदूषण नियम पाळणे गरजेचे.
– कोणत्याही धर्माच्या भावना दुखावणार नाही याची काळजी घेतली जावी
– 1 मे हा महाराष्ट्र दिन असल्याने धर्म, प्रांत, वंश, जात अशा कोणत्याही मुद्द्याविषयी वक्तव्य करु नये.
– कोणत्याही व्यक्तीचा, समुदायाचा अनादर होणार नाही याची काळजी घ्यावी.
– सभेच्या ठिकाणी असभ्य वर्तन होणार नाही याची काळजी घ्यावी.
– सभेपूर्वी व नंतर गाड्यांची रॅली, मिरवणूक काढता येणार नाही.
– लहान मुलं, महिला, वृद्ध यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी.
– सामाजिक सलोखा बिघडले असे वर्तन करु नये.
– सामाजिक वातावरण बिघडेल अशा घोषणा लोकांनी देऊ नयेत.

….तर हनुमान चालिसा लावा ; राज ठाकरे

सिटी चौक पोलिसात गुन्हा
औरंगाबादचे पोलिस आयुक्त निखिल गुप्तता यांनी सभेला 16 अटी घालून परवानगी दिली होती. सिटी चौक पोलिस ठाण्यात भादंवि कलम 116, 117, 153 अ आणि मुंबई पोलीस कायदा अधिनियम 135 अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी तपास अधिकारी म्हणून अशोक गिरी यांची नेमणूक करण्यात आली.

लेंडी नाल्याजवळील मयत तरुण जळगावात रहिवासी


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !