चोरीपूर्वीच चोरटा अडकला नागरीकांच्या जाळ्यात : चाळीसगावातील घटना
चाळीसगाव : चोरी करण्यासाठी आलेला चोरटा रहिवाशांमुळे जाळ्यात अडकला. याबाबत चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पंढरीनाथ नागो जाधव (25, हरीगिरी बाबा नगर, चाळीसगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
प्रेमात पडलेल्या मुलीचा जन्म-दात्यांनी केला गळा आवळून खून
रहिवाशांच्या सतर्कतेने चोरटा अडकला जाळ्यात
महेंद्र लक्ष्मणराव शितोळे (45, पोतदार शाळेजवळ, चाळीसगाव) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ते गॅरेज काम करून आपला उदरनिर्वाह करतात शिवाय शेती काम करतात. सोमवार, 2 मे रोजी रात्री 10 वाजता जेवण झाल्यानंतर महेंद्र शितोळे हे शेतात पाणी भरण्यासाठी गेले असता त्यावेळी सर्व कुटुंबीय झोपलेले होते तर मंगळवार, 3 मे रोजी पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास महेंद्र शितोळे आणि त्यांचा मावस भाऊ सचिन वाबळे हे दोघे शेतातून घरी आले. महेंद्र यांनी बाहेर गायीला चारा टाकला व घरात जात असताना त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी आत जाऊन पाहिले असता त्यांना एक चोरटा घरात चोरी करताना आढळून आला. महेंद्र आणि सचिन यांनी त्याला पकडून ठेवले. यात महेंद्रला जोराचा झटका दिल्याने ते ओट्याखाली पडले. परंतू सचिनने त्याला घट्ट पकडलेले होते.


मुलाच्या मृत्यूने व्याकुळ झालेल्या पित्यानेही केली आत्महत्या : यावल शहरातील घटना
चोरट्याविरोधात पोलिसात गुन्हा
दोघांनी गल्लीत आरडा-ओरड करता गल्लीतील सर्वजण जागे झाले. चोरट्याचे नाव विचारले असता पंढरीनाथ नागो जाधव (25, हरीगिरी बाबा नगर, चाळीसगाव) असे समोर आले आहेत. महेंद्र शितोळे यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात संशयीत आरोपी पंढरीनाथ जाधव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.