मेहरुण तलावावर गेलेल्या 16 वर्षीय बालकाचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू


जळगाव : मेहरूण तलावात मित्रांसोबत गेलेल्या 16 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हर्षल संजय महाजन (16, रा. अयोध्या नगर जळगाव) असे मयत झालेल्या मुलाचे नाव आहे.

तलावात बुडाल्याने मृत्यू
हर्षल महाजन हा आपल्या आई व वडील यांच्यासह अयोध्या नगरात वास्तव्याला आहे. वडील संजय महाजन हे एमआयडीसीतील बेन्झो केमीकल कंपनीत नोकरीला आहे तर हर्षल हा नववीचे शिक्षण घेत होता. मंगळवार, ३ मे रोजी सकाळी ९ वाजता संजय महाजन हे कामावर निघून गेले त्यांच्या नंतर हर्षल देखील मित्रांसोबत बाहेर निघून गेला. दरम्यान दुचारी तिन ते चार मित्रांसोबत मेहरूण तलावात पोहण्यासाठी गेला. दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास त्याला पाण्यातील खोलीचा अंदाज न असल्याने त्याच बुडाला. तो बुडाल्याचे पाहून किनाऱ्यावर उभे असलेले काही तरूणांनी आरडाओरड केली. या ठिकाणी काही पट्‌टीच्या पोहणाऱ्यांनी त्याला मयत स्थितीत बाहेर काढले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे, साईनाथ मुंढे यांनी घटनास्थळी धाव घेतली व मृतदेह जिल्हा शासकीय रूग्णालयात रवाना केला.



एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
घरच्यांना या घटनेची माहिती मिळताच आई, वडील व मित्रांनी जिल्हा शासकीय रूग्णालयात धाव घेवून प्रचंड आक्रोश केला. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !